धक्कादायक : लसीचे दोन डोस घेऊनही तुळजापूरची महिला डॉक्टर कोरोना पॉजिटीव्ह 

 
धक्कादायक : लसीचे दोन डोस घेऊनही तुळजापूरची महिला डॉक्टर कोरोना पॉजिटीव्ह

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवार  दि.१२ मार्च रोजी नव्या २७  कोरोना रुग्णाची भर पडली तर ३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले.तसेच एका रुग्णाचा मृत्यू  झाला,  त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २८७ झाली आहे. कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तुळजापूर शहरातील एका महिला डॉक्टरने कोरोना लसीकरणाचे दोन  डोस घेऊन देखील या डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

 तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात या डॉक्टर बालरोगतज्ञ म्हणून काम करीत असून त्यांना तापीची लक्षणे आढळून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यात त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंचल बोडके यांनी दिली. विशेष म्हणजे या महिला डॉक्टरांना कोरोना लसीचा दुसरा डोस देऊन एक आठवडा झाला होता. सध्या त्या महिला डॉक्टरची तब्येत स्थिर आहे 

गेल्या १५ दिवसापासून तुळजापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आता डॉक्टर ही पॉझिटिव्ह आल्या आहेत. विशेष म्हणजे या महिला डॉक्टरने कोरोना लसीचा दुसरा डोस देऊन एक आठवडा झाला होता.


गेल्या काही दिवसांपासून तुळजापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आता डॉक्टर ही पॉझिटिव्ह आल्या आहेत. कोरोनाची वाढती संख्या पाहता तुळजाभवानी मंदिरासह जिल्ह्यातील सर्व धार्मिक, प्रार्थना स्थळे दर रविवारी जनता कर्फ्यूच्या दिवशी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. तुळजापुरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची कडक अंमलबजावणी गरजेची आहे. तुळजापूर येथील अनेक व्यापारी, भाविक पुजारी सर्रास विनामस्क असून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले विनामस्क वावरत आहेत त्याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात १२ मार्च रोजी २७ कोरोना रुग्णाची भर, एक मृत्यू

From around the web