तुळजापूरच्या बोगस वेबसाइट प्रकरणात अनेक बडे मासे अडकले 

सायबर पोलीस , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस मूग गळून गप्प 
 
s

उस्मानाबाद - तुळजापूरच्या बोगस वेबसाईट प्रकरणात अनेक बडे मासे अडकले आहेत. त्यामुळे आरोपीना अटक करण्यास सायबर पोलीस , स्थानिक गुन्हे शाखेचे धजावत नसल्याची चर्चा सुरु आहे.आरोपीना दोन दिवसात अटक न केल्यास पोलीस आणि  आरोपीमधील 'अर्थपूर्ण' व्यवहार उघड करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवीच्या नावाने बोगस वेबसाईट काढून भक्तांना लुटण्याचा गोरखधंदा काही पुजाऱ्यांनी सुरु केला होता. कोरोना काळात मंदिर बंद असताना पूजा विधीच्या नावाखाली लूट करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड उस्मानाबाद लाइव्हने माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या माध्यमातून केला होता. 

त्यानंतर श्री तुळजाभवानी देवीच्या नावे बोगस वेबसाइट काढून भाविकांची फसवणूक करणाऱ्या  https://www.tuljabhavani.in/ या वेबसाइटसह २ https://tuljabhavanipujari.com / ३  https://www.tuljabhavanimandir.org/ ४. https://shrituljabhavani.com/ ५. https://epuja.co.in/ या पाच वेबसाईटवर भादंवि ४२०, ६६ c , ६६ d नुसार तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये २३ ऑक्टोबर रोजी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होवून आज नऊ दिवस झाले तरी सायबर पोलीस , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस मूग गळून गप्प आहेत. तुळजापूरचे पोलीस म्हणतात तपास सायबर पोलीसाकडे आहे. सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेख म्हणतात मी रजेवर असून, तपास आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दराडे यांच्याकडे आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सायबर पोलिसांकडे बोट दाखवत आहेत. 

विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी तक्रारकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांची भेट घेऊन आरोपींची नावे दिली होती,. त्यानंतर घाडगे यांनी  आरोपीना पकडण्याची जबाबदार पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्यावर सोपवली होती. आता पवार म्हणतात माझ्याकडे दुसरा तपास आहे. 

भुरट्या आरोपीना पकडून फोटो सेशन करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आता सायबर पोलिसांवर जबाबदारी ढकलत आहेत. पोलीस अधीक्षक नीवा जैन  लक्ष द्यायला तयार नाहीत, त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरु आहे. 

या प्रकरणात अनेक बडे मासे अडकल्याने पोलीस अटक करण्यात कुचराई करीत आहेत. आरोपीना  अटकपूर्व जामीन घेण्यास मुभा मिळावी यासाठीच पोलीस अटक करीत नसल्याची चर्चा सुरु आहे.

From around the web