अनिल देशमुख प्रकरणी उस्मानाबादसह आठ शहरांत छापे

उस्मानाबाद जिल्ह्यात नेमका कुणाच्या घरावर छापा ? 
 
s

उस्मानाबाद  - माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये केंद्रीय अन्वेषण पथकाने (सीबीआय) बुधवारी राज्यातील आठ  शहरांमध्ये १२ ठिकाणी छापे टाकले. यात एन्काऊंटर स्पेशलिस्ट सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील यांच्या मुंबई-पुणे आणि  पोलिस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या अहमदनगर येथील मालमत्तांवरही धाडी टाकण्यात अाल्या. या धाडसत्रामुळे अनिल देशमुख आणखीनच गोत्यात अाले असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. 

सीबीअाय पथकाने मंगळवारी रात्री अहमदनगर, नाशिक, ठाणे, सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, मुंबई आणि पुणे येथील मालमत्तांवर छापेमारी केली. या शिवाय इतर काही दलाल, मध्यस्थांच्या मालमत्तांवरही धाडी टाकण्यात आल्या मात्र त्यांची नावे सीबीआयने जाहीर केली नाहीत. सार्वजनिक हिताच्या पदावर नियुक्त असताना बेईमानी केल्याप्रकरणी सीबीआयने अनिल देशमुख आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . मुंबईचे माजी पोलिस आयक्त  परमबीरसिंग यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

उस्मानाबाद जिल्ह्यात नेमका कुणाच्या घरावर छापा ? 

 सीबीआयच्या गोपनीय पथकाने 27 जुलै रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेळका धानोरा ( ता कळंब ) या गावात तपासणी केल्याची माहिती मिळाली आहे. 

वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या बदलीच्या कामात महादेव इंगळे हा दलाल होता , त्यामुळे त्याच्या घरी केली तपासणी करण्यात आली. यावेळी महादेव इंगळे घरी नव्हता, त्यामुळे त्याच्या  आईचा  जबाब घेण्यात आल्याचे समजते. 

बदली प्रकरणात उस्मानाबादचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांचे नाव !


 

From around the web