उस्मानाबाद जिल्हयातील 33 हजार  मतदारासांठी 74 मतदान केंद्रावर मतदान होणार

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदासंघ निवडणूक 

 
उस्मानाबाद जिल्हयातील 33 हजार  मतदारासांठी 74 मतदान केंद्रावर मतदान होणार

 उस्मानाबाद -औरंगाबाद विभाग पदवीधर मतदासंघ निवडणूक प्रक्रिया ही लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रक्रिये सारखीच आहे. त्यानुषंगाने उस्मानाबाद जिल्हयातील सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी आदर्श आचार संहितेच पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कले आहे.

प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात  05 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ आयोजित आदर्श आचार संहिता अंमलबजावणी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रताप काळे आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर म्हणाले की, जिल्हयातील सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी वर्गांने आदर्श आचार संहितेचे पालन करावे. या निवडणुकी साठी जिल्ह्यात 72 मतदान केद्र व 2 सहाय्यक अशी एकूण 74 मतदान केंद्र निश्चित केली असून एकूण 33 हजार 67 मतदार आहेत. निवडणूकीची घोषणा झाल्याच्या तारखेपासून कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर किंवा होर्डिंग चौकात, सार्वजनिक ठिकाणी तसेच विद्युत  व बीएसएनएलच्या खांबावर राहणार नाही याची जबाबदारी नगरपरिषद क्षेत्रासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  व ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक यांच्यावर निश्चित

 
करण्यात आली असून त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचे बोर्ड किंवा कोनशीला झाकून ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये ढिलाई केल्यास संबंधितावर थेट गुन्हा नोंद करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.निवडणूक कालावधीत शासकीय वाहनाचा वापर राजकीय पदाधिकारी यांच्याकडून होऊ नये यासाठी संबधित अधिकारी वर्गांने दक्षता घेणे आवश्यक आहे.  या निवडणुकी साठी ज्या अधिकारी  व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.  त्यांनी  कोव्हिड -19 च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सूचित केले. तसेच सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी मास्क सॅनिटायझर याचा वापर करणे आवश्यक आहे.  यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी  व कर्मचाऱ्यांची मतदाना पूर्वी आठ दिवस अगोदरच आरोग्याची  ॲन्टीजेन  व आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार असून मतदानाच्या ठिकाणी देखील वैद्यकीय पथक तैनात करण्यात येणार आहे.

या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या पैकी एकानेही सेल्फ क्वारन्टाईन होऊ नये, अशा  सूचना देवून जिल्हाधिकारी म्हणाले की, या निवडणुकी साठी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी खातेप्रमुखांनी उपस्थित राहणे बंधनकारक असून निवडणुकी संदर्भात तालुका निहाय प्रशिक्षण देण्यासाठी योग्य नियोजन करण्याबरोबरच निवडणुकीची सर्व प्रक्रिया सर्वांनी आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, असे समजून प्रत्येकाने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री.दिवेगावकर यांनी केले.

**

From around the web