पोलिसाने केली एक हजार रुपयाच्या लाचेची मागणी 

उस्मानाबाद - आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक बाळू मेदने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल  
 
पोलिसाने केली एक हजार रुपयाच्या लाचेची मागणी

उस्मानाबाद -  आनंदनगर पोलीस स्टेशनचे  पोलीस नाईक बाळू अनुरथ मेदने ( बक्कळ नंबर १२२८ ) यांनी एका फिर्यादीस मोबाईल  चोरीची तक्रार नोंदवून घेण्यासाठी आणि त्याचे सर्टिफिकेट देण्यासाठीं एक हजार रुपये लाचेची मागणी केल्याने एसीबी पथकाने त्याच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. 

यातील तक्रारदार हे कुशन मेकरचा व्यवसाय करीत असून तक्रारदार यांचा मोबाईल पिकअप चालक घेवुन गेल्याची तक्रार साहेबांना सांगुन नोंदवुन घेण्यासाठी व त्याचे सर्टिफिकेट व एफआयआर देण्यासाठी पोलीस ठाणे आनंद नगर , उस्मानाबाद येथील बाळू अनुरथ मेदने  यांनी तक्रारदार यांचेकडे 1000 / -रु लाचेची मागणी केली होती .

 तक्रारदार यांना त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि . 08.04.2021 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , उस्मानाबाद येथील पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांचेकडे तक्रार दिली होती . 

सदर तक्रारीचे अनुषंगाने दि .08.04.2021 रोजी मेदने पोलीस यांची पोलीस ठाणे आनंद नगर , उस्मानाबादचे आवारात लाच मागणी पडताळणी केली असता त्यांनी तक्रारदार यांचेकडे नमुद कामासाठी 1000 / -रु लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले . त्यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , उस्मानाबाद तर्फे आज दि .08.04.2021 रोजी सापळा आयोजीत केला असता पोलीस ठाणे आनंद नगर , उस्मानाबाद येथील मेदने पोलीस यांना तक्रारदार यांचा संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडुन लाच रक्कम स्विकारली नाही . यावरुन त्यांचेविरुध्द पोलीस ठाणे आनंद नगर , उस्मानाबाद येथे लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे . 


सदर कारवाई मा . पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे , मा.अपर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक यांनी केली असुन सदर कारवाईस सपोफो / शिवाजी सर्जे , पोह / दिनकर उगलमुगले , पोह / पांडुरंग डंबरे , पोना / मधुकर जाधव यांनी मदत केली आहे . लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , उस्मानाबाद तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की , कोणताही शासकीय अधिकारी / कर्मचारी 1 ) महाराष्ट्र शासनाचे मानधन , अनुदान घेणारी व्यक्ती 2 ) खाजगी इसम शासकिय कामाकरिता अथवा शासकीय काम करुन दिले बद्दल लाचेची मागणी करीत असतील तर कृपया खालील मोबाईल , दूरध्वनीवर , टोल फ्री क्रमांकावर , लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मोबाईल अॅप्सद्वारे www.acbmaharashtra.net या संकेतस्थळावर तक्रारी नोंदविण्यासाठी संपर्क साधावा . 

मोबाईल क्रमांक : 1 ) मा.डॉ.राहुल खाडे , पोलीस अधीक्षक , ला.प्र.विभाग , औरंगाबाद मोबाईल क्रं . 8888807299 
2 ) श्री.प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक , ला.प्र.विभाग , उस्मानाबाद मो.नं. 9527943100 
3 ) टोल फ्री क्र . 1064 , दूरध्वनी क्र . - 02472-222879 E - Mail ID : - dysposmanabad@gmail.com

From around the web