दिलासा : टेम्पो चालकाच्या संपर्कातील सहा जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

 
सरणवाडी, ब्रम्हगाव सील : आ. सुजितसिंह ठाकूर यांची भेट 

 दिलासा : टेम्पो चालकाच्या संपर्कातील सहा जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

परंडा ( राहूल शिंदे)   - परंडा तालुक्यातील कोरोना बाधित पिकप टेम्पो चालकाच्या संपर्कातील सहा जणांचे  कोरोना  रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे तालुक्यातील जनतेने समाधानाचा सुस्कारा  सोडला आहे. दरम्यान, सरणवाडी आणि ब्रम्हगाव हे दोन्ही गावे सील  करण्यात आले असून या गावाला आ. सुजितसिंह ठाकूर यांनी  भेट  देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 


ग्रीन झोनमध्ये असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला सोमवारी   गालबोट लागले. तालुक्यातील सरणवाडी एका  पिकप टेम्पो चालकाचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता.  त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. 

गालबोट : उस्मानाबाद जिल्ह्यात एक कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण

त्यानंतर या टेम्पो चालकाच्या  संपर्कातील सहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठ्वण्यात आले होते. ते निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान संपर्कातील आणखी २९ जणांना इंस्टीट्यूशनल कोरेंटाइन करण्यात आले आहे. 

कोरोना बाधित टेम्पो चालकावर परंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी उपजिल्हाधिकारी विवेक जाॅनसन, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सय्यद आदींशी चर्चा करून परिस्थितीचा व आवश्यक व्यवस्था याचा आढावा घेतला. आवश्यक सर्व व्यवस्था करून देण्याबाबत आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी प्रशासनास आश्वस्त केले. सरणवाडी आणि ब्रम्हगाव सील   

सरणवाडी  येथील पिकप टेम्पो चालक टरबूज घेऊन नवी मुंबई येथे जात होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट येताच सरणवाडी आणि ब्रम्हगाव सील  करण्यात आले आहे. या गावांना आ. सुजितसिंह ठाकूर यांनी भेट देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांच्याशी चर्चा केली. जनतेने प्रशासनच्या सूचनांचे पालन करून घरीच राहून कुटुंबियांसह सुरक्षित रहा, असे आवाहन आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले आहे.  


जिल्ह्यातील सर्व 17 व्यक्तींचे स्वाब रिपोर्ट निगेटिव्ह:  जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत दिनांक 11 मे 2020 रोजी जिल्ह्यातील 17 व्यक्तींच्या थ्रोट स्वाब चे नमुने घेण्यात आले होते. ते सर्व नमुने तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले होते. आज त्या सर्व व्यक्तींच्या स्वाबचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.


परंडा तालुक्यात अत्यावश्यक सेवा आणि जीवनाश्यक दुकाने वगळता अन्य दुकाने बंद

From around the web