भाजप आमदार सुजितसिंह ठाकूरविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

 
भाजप आमदार सुजितसिंह ठाकूरविरुद्ध अखेर गुन्हा दाखल


पंढरपूर - लॉकडाऊनचे नियम मोडून विठ्ठल - रुक्मिणीची शासकीय महापूजा करणारे भाजपचे आमदार आणि पंढरपूर विठ्ठल - रुक्मिणी  मंदिर समिती सदस्य सुजितसिंह ठाकूर यांच्याविरुद्ध पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  लॉकडाऊन असल्यामुळे पंढरपूरचे श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. असे असताना शनिवारी पहाटे  चैत्री पौर्णिमेची शासकीय महापूजा भाजप आमदार आणि  मंदिर समितीचे सदस्य सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली होती.

 लॉकडाऊनचे नियम तोडल्यामुळे आ.सुजितसिंह ठाकूर, मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे,  उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप मांडवे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी  केली होती.

आ.सुजितसिंह ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अखेर भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर , विठ्ठल - रुक्मिणी  मंदिर समितीचे आणखी एक  सदस्य आणि शिवसेनेचे कार्यकर्ते  संभाजी शिंदे विरुद्ध  पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सध्या कोरोना व्हायरस च्या संसर्ग सुरू असतानाही दोघांनी  सपत्निक  एकत्र जमून पूजा केल्याबद्दल भा. द. वि २६९,२७०,१८८, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ब, व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम  ३७/३,१३५,, तसेच साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम  १८९७ चे कलम २,३.प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 

भाजप आमदार सुजितसिंह ठाकूरविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

From around the web