उस्मानाबादचे दोन पोलीस निरीक्षक निलंबित 

 
उस्मानाबादचे दोन पोलीस निरीक्षक निलंबित 


उस्मानाबाद - तुळजापूर आणि उमरगा येथून उस्मानाबाद पोलीस मुख्यालयात बदली केल्यानंतर गेले वर्षभर मेडिकल रजेवर असणाऱ्या दोन पोलीस निरीक्षकांना विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोली (  औरंगाबाद परिक्षेत्र ) यांनी निलंबित केले आहे.

 एस.आर.ठोंबरे आणि  सुरेश चाटे अशी या पोलीस निरीक्षकांची नावे  आहेत. १ नोहेंबर २०१९ रोजी  एस.आर.ठोंबरे यांची  तुळजापूर येथून आणि सुरेश चाटे यांची उमरगा येथून उस्मानाबाद  पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती, त्यानंतर हे दोघे मुख्यालयात रुजू होऊन लगेच वैद्यकीय रजेवर गेले होते. दोन वर्षाच्या आत बदली केली म्हणून उभयतांनी  मॅट मध्ये धाव घेतली असताना, त्यांच्या निलंबनाचा आदेश निघाल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.

कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता रजेवर जाणे, कोव्हीड सारख्या महामारीच्या काळात कामावर हजर न  होणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश न पाळणे असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. राजपत्रित अश्या जबाबदार पदावर असताना, बेशिस्त, बेजबाबदार वर्तन केल्यामुळे आपणस निलंबित करण्यात येत आहे, निलंबन काळात उस्मानाबाद पोलीस मुख्यालयात दैनंदिन हजेरी लावावी, असे एस.आर.ठोंबरे आणि  सुरेश चाटे यांच्या निलंबन आदेशात म्हटले आहे. 

From around the web