झेडपीचे डेप्युटी सीईओ अजिंक्य पवार सक्तीच्या रजेवर

 
उस्मानाबाद लाइव्हचा दणका 

झेडपीचे डेप्युटी सीईओ अजिंक्य पवार सक्तीच्या रजेवर


उस्मानाबाद - लॉकडाऊनचे नियम तोडून पुणे वारी करणारे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांना अखेर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. उस्मानाबाद लाइव्हने आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या माध्यमातून या प्रकरणाचा भांडाफोड केला होता.

काय आहे प्रकरण ? 

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार हे उस्मानाबादच्या बँक कॉलनीमध्ये एका खासगी जागेत भाड्याने राहतात. ते उस्मानाबादेत एकटेच तर त्यांची फॅमिली पुण्यात राहते.

लॉकडाऊन असताना,अजिंक्य पवार हे १७ एप्रिलला ते पुण्याला फॅमिलीला भेटायला गेले होते. २० एप्रिल (सोमवारी) रोजी पहाटे ते उस्मानाबादेत परत आले.अजिंक्य पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता मुख्यालय सोडले, त्यांनी खासगी कामासाठी शासकीय वाहनाचा गैरवापर केला, शिवाय प्रशासनाचा पास नसताना पदाचा गैरवापर केला. त्यांच्यावर  कडक कारवाई करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली होती.

अजिंक्य पवार सक्तीच्या रजेवर 

यासंदर्भात उस्मानाबाद लाइव्हने अनेक वेळा बातम्या प्रकाशित करून प्रकरण उचलून धरले होते. अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. संजय कोलते यांनी, अजिंक्य पवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवले असून, त्यांचा पदभार सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांच्याकडे देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या झेडपीच्या बड्या अधिकाऱ्यांना अभय

डेप्युटी सीईओ अजिंक्य पवार यांचा बेजबाबदारपणा उघडकीस

डेप्युटी सीईओ अजिंक्य पवार यांना कारणे दाखवा नोटीस

'त्या' जिल्हा परिषद अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा...

From around the web