केंद्राच्या निर्णयामुळे दुकानदारांत संभ्रमावस्था
Apr 25, 2020, 18:40 IST
आज रात्रीपर्यंत निर्णय अपेक्षित
उस्मानाबाद - केंद्र सरकारच्या गृह विभागाने आजपासून सलून, हॉटेल्स वगळून तसेच आणि मॉल्स सोडून अन्य दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली तरी राज्य सरकारने याबाबत अजून निर्णय न घेतल्याने उस्मानाबादसह राज्यभरात आज संभ्रमावस्था पसरली आहे. राज्य सरकार जोपर्यंत गाईडलाइन्स ठरवत नाही, तोपर्यंत राज्यभरातील अन्य दुकानदारांना दुकाने उघडता येणार नाहीत. त्यामुळे राज्यातील जनता राज्य सरकारच्या निर्णयाची वाट पाहात आहे. आज रात्रीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे.
दिलासा : आजपासून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी
दिलासा : आजपासून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी
केंद्र सरकारच्या गुह विभागाने आजपासून सलून, हॉटेल्स आणि मॉल्स वगळता अन्य दुकाने उघडण्यास परवानगी दिली, मात्र हा आदेश देताना राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. त्यावर आज मुंबई मंत्रालयात दिवसभर मिटिंग सुरु असून, गाईडलाइन्स ठरवण्याचे काम सुरु आहे. केंद्राच्या निर्णयानुसार हॉटस्पॉट भाग वगळून अन्य दुकाने दुकाने उघडण्यास परवानगी मिळू शकते.
जोपर्यंत राज्य सरकारचा निर्णय होत नाही किंवा गाईडलाईन्स ठरत नाहीत, तोपर्यंत दुकानदारांना दुकाने बंदच ठेवावी लागणार आहेत. केंद्राच्या निर्णयानंतर उस्मानाबाद शहरात काही दुकाने उघडली होती, पण नंतर बंद करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ताळमेळ नसल्याने लोकांबरोबर पोलीस यंत्रणाही संभ्रमावस्थेत सापडली आहे.
आजपासून ही दुकानं सुरु होणार
उस्मानाबादला होणार फायदा
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या एकही कोरोना बाधित रुग्ण नाही, जे तीन रुग्ण होते ते बरे झालेले आहेत. उस्मानाबाद जिल्हा सध्या कोरोना मुक्त असल्याने आणि ग्रीन झोन असल्याने गृह मंत्रालयाच्या या निर्णयाचा उस्मानाबाद जिल्हयाला फायदा होणार आहे. त्यासाठी नियमावली असेल आणि तसा आदेश जिल्हाधिकारी काढतील, अशी अपेक्षा आहे.
- ग्रामीण भागात शॉपिंग मॉल वगळता सर्व दुकाने सुरु होतील
- शहरी भागात एकेकटी दुकाने, मॉल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भाग नसलेली कोपऱ्यावरची दुकाने, रहिवासी सोसायट्यातील दुकाने उघडी राहतील
- तर मार्केट एरियातली, मॉल्स आणि मॉलमधील दुकाने बंदच राहतील
- ऑनलाईन ई कॉमर्स कंपन्याही फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच डिलीव्हरी करु शकतात
- लॉकडाऊन दरम्यान रेशन, भाजीपाला आणि फळांच्या दुकानासह केवळ आवश्यक वस्तू असलेली दुकाने उघडण्याची परवानगी आधीपासूनच आहे.
- दुकाने केवळ 50 टक्के कर्मचार्यांसह आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालून उघडता येऊ शकतात.
- दारुची दुकाने बंदच राहतील
- शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स अद्याप उघडणार नाहीत
- कोरोना हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमधील दुकाने देखील उघडण्यास परवानगी नाही
- महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीबाहेरील मल्टी-ब्रँड आणि सिंगल मल्टी-ब्रँडची दुकाने उघडणार नाहीत.
- सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, थिम पार्क, थिएटर, बार बंद राहील.
- सलून आणि ब्युटी पार्लर्स देखील बंद
उस्मानाबादला होणार फायदा
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या एकही कोरोना बाधित रुग्ण नाही, जे तीन रुग्ण होते ते बरे झालेले आहेत. उस्मानाबाद जिल्हा सध्या कोरोना मुक्त असल्याने आणि ग्रीन झोन असल्याने गृह मंत्रालयाच्या या निर्णयाचा उस्मानाबाद जिल्हयाला फायदा होणार आहे. त्यासाठी नियमावली असेल आणि तसा आदेश जिल्हाधिकारी काढतील, अशी अपेक्षा आहे.