सोशल मीडियावर अफवा पसराविल्यास गुन्हा दाखल होणार

 
उस्मानाबादच्या  पोलीस अधीक्षकांनी दिले निर्देश 

सोशल मीडियावर अफवा पसराविल्यास गुन्हा दाखल होणार

उस्मानाबाद -  कोरोनामुळे एकीकडे जनता भयभीत झाली असताना  सोशल मीडियावर अफवा पसराविल्या जात आहेत, त्यामुळे जनता अधिक भयभीत होत आहे. त्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला दिले आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचा एकही पॉजिटीव्ह रुग्ण आढळलेला नाही, तरीही अमुक गावात कोरोनाचे इतके रुग्ण आढळले म्हणून खोटे मेसेज फॉरवर्ड केले जात आहेत. फेसबुक, व्हाट्स अँपवर ते मेजेस व्हायरल केले जात आहेत, न्यूज चॅनल्सच्या बातम्यांचे स्क्रीन शॉट्स काढून त्यावर मॉर्फ करून अमुक गावात कोरोना व्हायरसचे इतके रुग्ण आढळले म्हणून  मेसेज फॉरवर्ड केले  जात आहेत. त्यामुळे अगोदरच भयभीत झालेली जनता आणखी भयभीत होत आहे. 

याविरुद्ध आता पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. खोटे मेसेज फॉरवर्ड करणे हा कायदेशीर गुन्हा असून, पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी खोटे मेसेज फॉरवर्ड करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला दिले आहेत. 

हा उपाय करा 

व्हाट्स अँप ग्रुप ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये जावून सेंड मेसेज फक्त ओन्ली ऍडमिन करावा, जेणे करून फक्त ऍडमिनलाच मेजेस पोस्ट करण्याचा अधिकार राहील. असे न केल्यास खोटे मेसेज फॉरवर्ड करणाऱ्याबरोबर ऍडमिनवर गुन्हा दाखल होऊ शकतो.From around the web