परंडा तालुक्यात गारपीट व वादळी वाऱ्याने मोठे नुकसान

 
परंडा तालुक्यात गारपीट व वादळी वाऱ्याने मोठे नुकसान


परंडा   (राहूल शिंदे)-  आज रविवारी दिवसभर सूर्य अगदी आग ओकत होता,तापमानाचा पारा अगदी ४० अंश सेल्सिअसवर गेलेला होता, तीव्र उष्णतेची जाणीव होत होती.आणि अचानक दुपारी साडेचार वाजता  निसर्गाने तीव्र रुद्र रूप धारण केले  व प्रचंड वादळी वाऱ्यासह गारपीट व पाऊस पडू लागला.

  परंडा  तालुक्यातील देवगाव(बु), जेकटेवाडी व परिसरातील कित्येक घरावरील पत्रे,गोट्यावरील छपर, जनावरांसाठी वर्षभर पुरेल येवढा साठवलेला चारा,कडबा वादळी वाऱ्यामुळे सर्वत्र पसरला गेला. वीज पुरवठा करणाऱ्या विद्युततारा व विद्युत पोल अगदी जमीनीवर पडले.त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात फळ झाडांचे नुकसान देखील झाले.यामध्ये आंबा,केळी,चिक्कू,लिंबू,मका  यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

शेताच्या ताली अगदी तुडुंब भरून फुटल्या आहेत, जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होते.आणखी काही वेळ हीच परिस्थिती राहिली असती तर प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते.व जनजीवन अगदी विस्कळीत झाले असते.याचं वर्षी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

परंडा तालुक्यात गारपीट व वादळी वाऱ्याने मोठे नुकसान https://www.osmanabadlive.com/2020/05/osmanabad-Paranda-Untimely-rain-Damage.html?m=1

Posted by Osmanabad Live on  Sunday, May 10, 2020
दरम्यान मागील वर्षी  राज्यपालानी  सरसकट  हेक्टरी आठ हजार रु तुटपुंजी आर्थिक मदत जाहीर केली होती, ही मदत  देखील अद्याप  कोणत्याच शेतकऱ्यांना मिळाली नाही.शिवाय लॉकडाऊनमुळे शेतकरी वर्गाचे देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

परंडा तालुक्यात गारपीट व वादळी वाऱ्याने मोठे नुकसान https://www.osmanabadlive.com/2020/05/osmanabad-Paranda-Untimely-rain-Damage.html?m=1

Posted by Osmanabad Live on  Sunday, May 10, 2020

From around the web