उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मे पासून सर्व व्यवहार सुरु होणार ?
Sun, 3 May 2020
ग्रीन झोन साठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २१ दिवसांत कोरोना बाधित एकही रुग्ण सापडलेला नाही आणि सध्या जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही, त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात उद्या ४ मे पासून खालील व्यवहार सुरु होऊ शकतात.
ग्रीन झोन मधील व्यवहार
● ग्रीन झोनमध्ये सर्व व्यवहार सुरू राहतील.
मात्र ज्या गोष्टींमुळे गर्दी होईल असे सिनेमागृह,शॉपिंग मॉल्स, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था,रेल्वे सेवा, सामाजिक, राजकीय, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम सुरू ठेवता येणार नाहीत.
● अधिकृत पास असल्याशिवाय ग्रीन झोनमध्ये प्रवास करण्यास मनाई असेल.
● प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के व्यक्तींना घेऊन बस सेवा सुरू ठेवण्यास परवानगी असेल. बस डेपोमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही पन्नास टक्क्यांपर्यंत मर्यादित इतकीच असावी.
● बस सेवेला फक्त ग्रीनझोनच्या आतच फिरण्यास परवानगी असेल.
● राज्य सरकारने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना किंवा आदेश काढून ज्या गोष्टींना परवानगी दिली आहे. त्या विशिष्ट अटींच्या अधीन राहून सुरू ठेवता येतील.
● उस्मानाबाद जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये असल्याने केशकर्तनालय (सलून) उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे
मद्यविक्रीला परवानगी
बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून ६ फुटांचे अंतर राखावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे
सलूनबाबत गृहमंत्रालयाची नियमावली जारी
गृहमंत्रालयाने दारुची दुकानं, पानटपऱ्या, ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यासंबंधी काही नियम ठरवण्यात आले आहेत.
– दुकानांवर एकमेकांपासून जवळपास सहा फुटांचं अंतर ठेवावं.
– दुकानावर एकावेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती नको.