उस्मानाबाद : चार चाकी गाडी आणि २५ लाखाचे आमिष 

भामट्याने एका महिलेस साडेतीन लाखास गंडवले 
 
उस्मानाबाद : चार चाकी गाडी आणि २५ लाखाचे आमिष
बोगस कौन बनेगा करोडपतीची लॉटरी आली अंगलट 

उस्मानाबाद -  “कौन बनेगा करोडपती मधून बोलतोय, तुम्हाला २५ लाखाची लॉटरी लागली आहे म्हणून एका भामट्याने . चिलवडी, ता. उस्मानाबाद येथील एका महिलेस तब्बल साडेतीन लाखास  गंडा घातला आहे. याप्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


“कौन बनेगा करोडपती मधून मी राणा प्रताप सिंह, कोलकत्ता येथून बोलतोय तुम्हाला चारचाकी गाडी व 25 लाखाची लॉटरी लागली आहे. त्यासाठी खाते उघडण्यासाठी मी दिलेल्या बँक खात्यांत तुम्हाला काही रक्कम जमा करावी लागेल.” असा फोन कॉल श्रीमती- निता अशोक डिसले, रा. चिलवडी, ता. उस्मानाबाद यांना दि. 15.06.2020 पासून अनेकदा आला. 

यावर निता डिसले व त्यांचा मुलगा- रामराजे यांनी त्या समोरील व्यक्तीने वेळोवेळी पाठवलेल्या एसबीआय च्या 12 बँक खात्यांत एकुण 3,50,000 ₹ वेगवेगळ्या ग्राहक केंद्रात जाउन भरले. तरीही त्या अज्ञात व्यक्तीने निता डिसले यांना कॉल करुन “आणखी 1,50,000 ₹ भरल्यास आम्ही गाडी व 25 लाख रुपये घेउन तुमच्या घरी येउ.” असे सांगीतल्याने निता डिसले यांचा संशय बळावला आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशा मजकुराच्या निता डिसले यांनी आज दि. 18.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web