कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी तीन जणांचा मृत्यू
Aug 1, 2020, 20:34 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासात (शनिवारी ) तीन जणांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद येथून आलेल्या रिपोर्ट मधून आणखी 4 कोरोना रुग्णाची वाढ झाली आहे.
🔹 जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 31/07/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोशाळेत 402 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील प्रयोशाळेत 111 असे एकूण 513 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आलेले आहेत, त्याचा स्वाब अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल. तसेच आज दुपारी औरंगाबाद येथून 44 स्वाबचा अहवाल प्राप्त झाला असून त्याचा अहवाल खालील प्रमाणे आहे.
➤ पाठवण्यात आलेले स्वाब - 548
➤ प्राप्त अहवाल - 44
➤पॉझिटिव्ह - 04
➤ निगेटिव्ह -17
➤ इनकनक्लुझिव्ह - 23
➤ प्रलंबित - 504
🔹मृत्यू बाबतची माहिती:-
1) 45 वर्षीय पुरुष, फिल्टर टाकीजवळ, उस्मानाबाद.(बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू)
2) 50 वर्षीय पुरुष, किनारा हॉटेल जवळ, उस्मानाबाद.
3) 75 वर्षीय पुरुष, लहुजी नगर, उस्मानाबाद.
🔹चार पॉजिटीव्ह रुग्ण : उमरगा
1) 50 वर्षीय पुरुष, कोळीवाडा उमरगा.
2) 37 स्त्री, महादेव गल्ली, उमरगा.
3) 16 वर्षीय स्त्री, महादेव गल्ल्ली, उमरगा.
4) 14 वर्षीय पुरुष, महादेव गल्ली, उमरगा.
🔹 जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1290
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 516
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 717
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 57
◼️वरील माहिती. दि 01/08/2020 रोजी सायंकाळी 08:30 वाजेपर्यंतची आहे.