उस्मानाबादेत कोरोनामुळे तिसरा बळी @ ७३
Jun 1, 2020, 10:05 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने आता तिसरा बळी घेतला आहे. शिराढोण ता.कळंब येथील एक ६४ वर्षाची महिला आज सकाळी उस्मानाबादच्या रुग्णालयात मरण पावली. या महिलेला तीन दिवसापूर्वी उस्मानाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला कोरोना कश्यामुळे झाला, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रविवारी दोन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता ७३ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील काल ९० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ७५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व तीन व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे. आणखी दहा अहवाल प्रलंबित असून, त्यांचे रिपोर्ट आज येणार आहे, त्यामुळे आणखी धाकधूक वाढली आहे.
- उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - ७३
- एकूण बरे झालेले रुग्ण - १९
- उपचार घेत असलेले रुग्ण - ५१
- एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - ३