उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन कोरोना रुग्ण

 
शुक्रवारी दिवसभरात चार रुग्ण सापडले 
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन कोरोना रुग्ण


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात चार जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत. शुक्रवारी दुपारी वाशी तालुक्यातील पिंपळगावच्या पती-  पत्नीचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले होते, त्यानंतर रात्री उशिरा दोन जणांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत. त्यात पाथर्डी (ता. कळंब) आणि कुकडगाव ( ता. परंडा) येथील रुग्णाचा समावेश आहे.वाशी : पिंपळगावचे आणखी दोन रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह

उस्मानाबाद जिल्ह्यातील  10 व्यक्तींचे  अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून 7 व्यक्तींचे अहवाल  अनिर्णित (Inconclusive) आले असून एका व्यक्तीचा अहवाल परिपूर्ण न आल्यामुळे  रद्द (reject)करण्यात  आला आहे.दोन पॉझिटिव्ह व्यक्तीपैकी एक कळंब तालुक्यातील पाथर्डी व दुसरी व्यक्ती परंडा तालुक्यातील कुकडगाव येथील आहे.
विशेष म्हणजे आजच  पाथर्डी येथील दाम्पत्याने कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता, पण याच गावात पुन्हा नवा रुग्ण सापडला आहे.

कळंब :पाथर्डीच्या दाम्पत्याची कोरोनावर मात

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत  कोरोना रुग्णाची संख्या २८ झाली आहे. पैकी सहा जण बरे झाले असून, २२ जणांवर उपचार सुरु आहेत.

From around the web