उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी तीन कोरोना रुग्ण वाढले

 
 उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी तीन कोरोना रुग्ण वाढले


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यतील आणखी तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उस्मामाबाद शहरातील  पापनाश नगर मधील एक, कळंब तालुक्यातील शिराढोण येथील एक आणि उस्मानाबाद तालुक्यातील तेर मधील एक जण आहे. उस्मानाबाद मधील रुग्ण मुंबई रिटर्न ,तेर मधील रुग्ण पुणे रिटर्न  तर शिरढोण मधील रुग्ण कोरोना बाधित कुटुंबातील  आहे.;  उस्मानाबाद जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णाची  संख्या ३८ झाली आहे.


 जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत दिनांक 25 मे 2020 रोजी लातूर येथील प्रयोगशाळेत  पाठवलेल्या अहवाला मधील प्रलंबित असलेल्या पाच अहवालांमधून तीन व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दोन व्यक्तीचे अहवाल अनिर्णीत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.. 



पॉझिटिव्ह आलेल्या तीन व्यक्ती पैकी एक उस्मानाबाद शहरातील पापनाश नगर चा रुग्ण असून तो मुंबई येथून प्रवास करून आलेला आहे. दुसरा तेर येथील रुग्ण असून तो पुणे येथून प्रवास करून आलेला आहे. तर तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण हा कळंब  तालुक्यातील शिराढोण येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेला आहे, असे डॉक्टर सतीश आदरतराव व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर गलांडे यांनी कळविले आहे.


पैकी आठ जणांना  डिस्चार्ज   देण्यात आला आहे.विशेष म्हणजे  डिस्चार्ज   देण्यात आलेल्या एका महिलेचा रिपोर्ट पुन्हा पॉजिटीव्ह आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३० रुग्णावर उपचार सुरु आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यत सर्वाधिक रुग्ण उमरगा तर सर्वात कमी रुग्ण तुळजापूर तालुक्यात आहेत.  उमरगा - ८, कळंब -८, परंडा -६, लोहारा- ५, उस्मानाबाद - ५, वाशी -३, भूम - २, तुळजापूर - १  अशी तालुकानिहाय संख्या आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत चालल्याने चिंतेचे वातवरण पसरले आहे.  

From around the web