उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

 
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज  ( शुक्रवार ) कोरोनाचा  पहिला बळी गेला  आहे. उमरगा तालुक्यातील बेडगा येथील एका  कोरोनाग्रस्त रुग्णाचा  मृत्यू झाला आहे. तो मुंबईहुन गावी आला होता. गंभीर बाब म्हणजे  त्या रुग्णाच्या घरातील आणखी दोघेजण कोरोनाग्रस्त आहेत.मरण पावलेल्या या कोरोनाग्रस्त रुग्णाचे वय ६७ असून तो मुंबईहून गावी आला होता. मुंबईत रिक्षा चालक म्हणून काम करणाऱ्या या रुग्णाला २५ मे रोजी उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, त्याचा २६ मे रोजी कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता तर आज मृत्यू झाला. त्यास मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होता, त्यात कोरोना झाल्यामुळे त्याचा श्वासोश्वास कोंडत होता. त्यामुळे त्याचा  मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले.


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६२  जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले असून पैकी पंधरा  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सद्यस्थितीत ४७  रुग्ण उपचार घेत आहेत.   पैकी एकाचा मृत्यू  झाला आहे. From around the web