उस्मानाबाद जिल्हा : आणखी सात कोरोना रुग्ण वाढले @ ५०

 
उस्मानाबाद जिल्हा :  आणखी सात कोरोना रुग्ण वाढले @ ५०


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्याने आता कोरोना मध्ये अर्धशतक मारले आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यात सात जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात तुळजापूर तालुक्यातील कार्ला ३, लोहारा तालुक्यातील जेवळी  येथील २, उस्मानाबाद तालुक्यातील  धुता येथील एक आणि उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील एक असा समावेश आहे.

गंभीर बाब म्हणजे, उस्मानाबाद तालुक्यातील धुत्ता येथील एका नऊ वर्षाच्या मुलाला कोरोनाची बाधा झालेली आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 50  रुग्ण आढळून आलेले आहेत. पैकी बारा  जणांना डिस्चार्ज  देण्यात आला आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीत 38 रुग्णावर उपचार सुरु आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत दिनांक 26 मे 2020 रोजी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या स्वाब पैकी 11 व्यक्तींच्या स्वाबचे रिपोर्ट प्रलंबित होते. त्या 11 पैकी 7 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह (    त्यापैकी 2 जुन्याच रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह), 2 निगेटिव्ह व 2 अनिर्णीत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.     पॉझिटिव्ह आलेल्या सात व्यक्ती पैकी पाच नवीन रुग्ण असून  दोन रुग्णाचे अहवाल पूर्वीच पॉझिटीव्ह आलेले आहेत. पाच नवीन पॉझिटिव रुग्णांपैकी तुळजापूर तालुक्यातील कारला येथील तीन रुग्ण असून ते मुंबई रिटर्न आहेत. तसेच धुता येतील एक रुग्ण असून तो पूर्वीच्या  रुग्णाच्या कॉन्टॅक्ट मधील असून तोही मुंबई रिटर्न आहे. तर एक रुग्ण हा केसर जवळगा येथील असून पूर्वीच्या पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील आहे, अशी माहिती डॉक्टर सतीश आदटराव व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर गलांडे यांनी दिली आहे.

उस्मानाबाद जिल्हा :  आणखी सात कोरोना रुग्ण वाढले @ ५०

From around the web