कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात आज आठ पॉजिटीव्ह

 
कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात आज आठ पॉजिटीव्ह


उस्मानाबाद  - उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ  जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यात  उमरगा तालुक्यातील पाच, परंडा तालुक्यातील  २ आणि बार्शी तालुक्यातील नागोबाची वाडी येथील एक असा समावेश आहे.



आज ३०  जून रोजी  सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 112  स्वाब तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून आठ  पॉजिटीव्ह 94  निगेटिव्ह,  10 अनिर्णित असा  रिपोर्ट आला आहे.


पॉजिटीव्ह रुग्णामध्ये उमरगा शहरातील चार आणि  उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील एक, बार्शी तालुक्यातील नागोबाची वाडी येथील एक , परंडा तालुक्यातील नालगाव एक आणि आसू येथील एक असा समावेश आहे.

उस्मानाबाद लाइव्ह वरील बातम्या जलद गतीने वाचण्यासाठी आमचा नवीन अँप डाऊनलोड करा.

Osmanabad LIve New App


कोरोना बाधित रुग्ण - 228
बरे झालेलं रुग्ण - 173
मृत्यू - 11
ऍक्टिव्ह रुग्ण 44

पाहा व्हिडीओ 





From around the web