खळबळजनक : उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण ३३ कोरोना रुग्णाची भर

 

खळबळजनक : उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण ३३ कोरोना रुग्णाची भर


उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी सकाळी १० वाजता ३३  कोरोना रुग्णाची भर पडली आहे. त्यात उस्मानाबाद शहरातील सात, उस्मानाबाद जिल्हा तात्पुरते कारागृहातील 11 कारागृह बंदी तसेच सहा कर्मचारी त्याचबरोबर  वाशी तालुक्यातील तीन, तुळजापूर तालुक्यातील तीन आणि जिल्हा बाहेर उपचार घेणाऱ्या तीन रुग्णाचा समावेश आहे.

उस्मानाबाद येथून १२ जुलै रोजी लातूर येथे जे स्वाब पाठवण्यात आले होते, त्यापैकी ९८ रिपोर्ट्स पेंडिंग होते, त्याचा रिपोर्ट सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत.त्यात 13 पॉजिटीव्ह., ३ रिजेक्टेड,१६ अनिर्णित.६६  निगेटिव्ह असा रिपोर्ट प्राप्त झाला आहे.


 पॉजिटीव्ह रुग्ण असे.. 

उस्मानाबाद तालुका शहर - ७ 

➜80 वर्षीय पुरुष रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
➔10 वर्षीय मुलगा, रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
➔38 वर्षीय महिला रा. माळी गल्ली, उस्मानाबाद
➔14 वर्षीय मुलगी रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
➔53 वर्षीय महिला, रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
➔35 वर्षीय पुरुष, रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
➔25 वर्षीय पुरुष, रा. माळी गल्ली उस्मानाबाद.

वाशी तालुका - ३

➔71 वर्षीय पुरुष रा तेरखेडा.
➔20 वर्षीय पुरुष रा. पार्डी.
➔18 वर्षीय  पुरुष रा. पार्डी.


तुळजापूर तालुका - ३ 

➔29 वर्षीय पुरुष रा सावरगाव.
➔45 वर्षीय महिला रा. सावरगाव.
➔53 वर्षीय पुरुष रा. तुळजापूर.

दि. 13/07/2020 रोजी बाहेर जिल्ह्यात पॉजिटीव्ह आलेल्या व तेथेच उपचार घेत असलेले 03 रुग्ण, खालीलप्रमाणे. 
➔35 वर्षीय पुरुष रा. भूम (सोलापूर येथे उपचार ).
➔50 वर्षीय पुरुष रा. परांडा (सोलापूर येथे उपचार ).
➔53 वर्षीय पुरुष (बार्शी, येथे ).

दि. 13/07/2020 रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट किट्स उपलब्ध झाल्यामुळे, त्या माध्यमातून तात्पुरते कारागृह उस्मानाबाद येथील 58 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली, त्यापैकी 17 जण पॉजिटीव्ह आले आहेत  त्यात सहा  कारागृह कर्मचारी आणि 11 कारागृह बंदी आहेत. 

➔त्यामुळे जिल्ह्यात एकूण 33 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.

 उस्मानाबाद जिल्ह्यात  इतक्या मोठ्या प्रमाणात  कोरोना रुग्णाची पहिल्यांदा भर पडली आहे. 


➤जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या -418.
➤आजपर्यंतचे डिस्चार्ज -250.
➤एकूण मृत्यू -17.
➤उपचाखालील रुग्ण -151.

From around the web