उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी १२३ कोरोना पॉजिटीव्ह

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे सक्तीच्या रजेवर 

उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी १२३ कोरोना पॉजिटीव्ह

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवार दि. १ ऑगस्ट रोजी १२३ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. दरम्यान  निष्क्रिय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले असून आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्नाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच[प्रमाणे मृत्यू दर वाढला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन रुग्णाचा मृत्यू हा निष्क्रियतेचे बळी ठरले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉ. गलांडे यांचे उस्मानाबाद दौऱ्यात कान टोचले होते, परंतु त्यांच्या  कार्यपद्धतीमध्ये बदल झाला नाही. आरोग्य यंत्रणेशी त्यांचा समन्व्य नव्हता. त्यामुळे कोरोना रुग्णाचा मृत्यू दर वाढला होता. अखेर गलांडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. डॉ. डी.के. पाटील यांच्याकडे प्रभारी चार्ज देण्यात आला आहे.

आजचे कोरोना रिपोर्ट असे... 

उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी १२३ कोरोना पॉजिटीव्ह

उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी १२३ कोरोना पॉजिटीव्ह

उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी १२३ कोरोना पॉजिटीव्ह
From around the web