कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी दोघांचा मृत्यू
Aug 5, 2020, 20:15 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २४ तासात ( बुधवारी ) कोरोनामुळे दोघांचा बळी गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाची संख्या आता ६१ गेली आहे.
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 04/08/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोशाळेत 138 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील प्रयोशाळेत 177 असे एकूण 315 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आलेले आहेत, त्याचा स्वाब अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल.
🔷 आज दिवसभरात पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात 81 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.
🔷रॅपिड अँटीजेन टेस्टचा पॉझिटिव्ह अहवाल उद्या सविस्तर देण्यात येईल.
🔹 मृत्यू बाबतची माहिती:-
1) 77 वर्षीय पुरुष, अणदुर ता. तुळजापूर.
2) 65 वर्षीय पुरुष, फातिमानगर लोहारा. (औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू)
🔹 जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1709 (* 18 रॅपिड अँटीजेन टेस्ट)
🔹 जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 620
🔹 जिल्ह्यातील एकूण उपचारा खालील रुग्ण - 1023
🔹 जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 61
🔹 घरी विलगीकरण करण्यात आलेले रुग्ण - 05
◼️वरील माहिती. दि 05/08/2020 रोजी सायंकाळी 08:00 वाजेपर्यंतची आहे.