कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 14 पॉजिटीव्ह @137

 
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 14 पॉजिटीव्ह @137


उस्मानाबाद - गेले दोन दिवस खंड पडलेल्या कोरोना रुग्णात आज एकदम 14 जणांची भर पडली आहे. या 14 जणांमध्ये उस्मानाबाद शहरातील उस्मानपुरा, काकानगर भागातील 12 आणि नळदुर्ग ता. तुळजापूर येथील दोन जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या 137  झाली आहे.आजपर्यंत एकाच दिवशी १४ कोरोना रुग्ण प्रथमच प्रथमच आज  आढळले आहेत,  हे विशेष.

९ जून रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 54 samples शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे  तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले .त्यापैकी 14 पॉझिटिव्ह,6 inconclusive व 34 निगेटिव आले आहेत.

पॉझिटिव पेशंट ची माहिती -

12 पेशंट उस्मानपुरा  उस्मानाबाद येथील असून पूर्वीच्या पेशंट च्या संपर्कातील आहेत. 2 पेशंट हे  नळदुर्ग  येथील  असून  पुणे  येथून  आलेले  आहेत .जिल्हयात रुग्णाची संख्या अशी 

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण -137
एकूण बरे झालेले  रुग्ण - 76
उपचार घेत असलेले रुग्ण -58
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3


तालुकानिहाय रुग्ण 

उस्मानाबाद - 55
कळंब- 33
उमरगा - 16
परंडा - 11
लोहारा -8
वाशी - 4
तुळजापूर -7
भूम -3  


From around the web