चिंताजनक : उस्मानाबाद जिल्ह्यात २० कोरोना रुग्णाची भर
Jul 9, 2020, 07:20 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारचा दिवस चिंतेत भर टाकणारा ठरला आहे. जिल्ह्यातील तब्बल २० जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उमरगा तालुक्यातील दहा, उस्मानाबाद शहरातील आठ आणि परंडा तालुक्यातील दोन रुग्णाचा समावेश आहे,
दि. ८ जुलै रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 157 नमुने तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 20 पॉजिटीव्ह, 120 निगेटिव्ह, एक रिजेक्टेड व ८ अनिर्णित व 8 पेंडिंग असा रिपोर्ट प्राप्त झाला आहे.
पॉजिटीव्ह रुग्ण असे...
➤ उमरगा तालुका : पाच प्रॉपर उमरगा, दोन डाळिंब, दोन बेडगा व एक तलमोड येथील रुग्ण आहेत.
➤उस्मानाबाद शहर : सात रुग्ण झोरे गल्ली येथील असून पूर्वीच्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत व एक काळा मारोती चौक, नाना डेअरी जवळचा आहे.
➤ परांडा तालुका : एक आवर पिंपरी येथील व एक धोत्री येथील आहे.
एकूण बाधित रुग्ण : ३३१
बरे झालेले रुग्ण - २०७
मृत्यू - १४
एक्टीव्ह रुग्ण - ११०