उस्मानाबाद जिल्ह्यात दोन नवे आणि दोन जुने रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह
Jun 22, 2020, 20:04 IST
उस्मानाबाद - जिल्ह्यतील चार जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात सलगरा, ईडा, नाळी वडगाव, फनेपूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आता १८३ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ जणांचा स्वाब आज तपासणीसाठी लातूर येथे पाठवण्यात आला होता, पैकी चार पॉजिटीव्ह, दोन inconclusive आणि ३६ निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत.
पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये सलगरा ता. तुळजापूर, ईडा ता. भूम , नाळी वडगाव ता. भूम फनेपूर ता. लोहारा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे . सलगरा आणि फनेपूर येथील रुग्ण पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत तर ईडा आणि नाळी वडगाव रुग्ण मुंबई येथून गावी आलेले आहेत.
तुळजापूर तालुक्यातील दोन रुग्ण पूर्वीच पॉजिटीव्ह आले असून सोलापूर येथे उपचार घेत होते, ते उस्मानाबादकडे वर्ग करण्यात आले आहेत.
एकूण कोरोना बाधित रुग्ण -१८३
बरे झालेले रुग्ण १३६
मृत्यू -७
एक्टिव्ह रुग्ण -४०