कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात एक पॉजिटीव्ह @१२३

 

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात एक पॉजिटीव्ह @१२३


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारचा दिवस थोडा दिलासाजनक ठरला. ६४ पैकी फक्त एक रिपोर्ट कोरोना पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या १२३ झाली आहे.

७ जून रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 64 सँपल्स  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे  तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले .त्यापैकी 1 पॉझिटिव्ह,1 inconclusive व 62 निगेटिव आले आहेत.


पॉझिटिव रुग्ण वाणेवाडी ( ता.उस्मानाबाद ) येथील असून तो  सहा दिवसापूर्वी  नवी मुंबई येथून  आलेला  आहे.



उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - 123
एकूण बरे झालेले  रुग्ण - 58
उपचार घेत असलेले रुग्ण -62
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3
 


तालुकानिहाय रुग्ण 

उस्मानाबाद - 43
कळंब- ३३
उमरगा - १६
परंडा - ११
लोहारा - ८
वाशी - ४
तुळजापूर - ५
भूम - ३ 

From around the web