कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात ६ जुलै रोजी आठ पॉजिटीव्ह
Jul 6, 2020, 22:52 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यतील आठ जणांचा कोरोना रिपोर्ट सोमवारी पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उमरगा तालुक्यातील तीन, परंडा तालुक्यातील दोन, तुळजापूर शहरातील दोन आणि उस्मानाबाद तालुक्यातील एक असा समावेश आहे.
६ जुलै ( सोमवार ) रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 98 नमुने तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते व पूर्वीचे 7 पेंडिंग असे एकूण 105 रिपोर्ट्स प्राप्त झाले असून आठ पॉजिटीव्ह , 11 अनिर्णित 5 रिजेक्ट व 81 अनिर्णित रिपोर्ट प्राप्त झाला आहे.
पॉजिटीव्ह रुग्ण असे
दोन रुग्ण आवार पिंपरी ता परांडा येथील आहेत ( पूर्वीच्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत)
दोन रुग्ण तुळजापूर येथील आहेत.
रुग्ण रुग्ण उमरगा तालुक्यातीळ असून त्यातील एक रुग्ण कसगी येथील व दोन उमरगा शहरातील आहेत ( ते पूर्वीच्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत .
एक रुग्ण इर्ला ता उस्मानाबाद येथील आहे ( पूर्वीच्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहे
- एकूण कोरोना बाधित रुग्ण - २९६
- बरे झालेले रुग्ण - १९८
- मृत्यू - १४
- एक्टीव्ह रुग्ण - ८४