धक्कादायक : उस्मानाबाद जिल्ह्यातील बारा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह @116

 
धक्कादायक :  उस्मानाबाद जिल्ह्यातील बारा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह @116


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील बारा जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे आजपर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णाची संख्या ११६ झाली आहे. पैकी ५६ रुग्ण बरे झाले आहेत. 
आज ५ जून रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 45 जणांचे रिपोर्ट  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले  आहेत. 
त्यापैकी बारा  पॉझिटिव्ह,4 inconclusive  व 29 निगेटिव्ह आले आहेत. 

पॉजिटीव्ह रुग्ण असे 
आठ  पेशंट शिरढोण  ता.कळंब येथील असून हे सर्व पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहेत. व दोन पेशंट हासेगाव  ता. कळंब  येथील  पूर्वीच्या आंदोरा येथील पेशंटच्या संपर्कातील आहेत असे एकूण दहा पेशंट कळंब तालुक्यातील  आहेत. व दोन पेशंट ढोकी  ता  उस्मानाबाद  येथील  असून ते पुणे  रिटर्न  आहेत.


उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - ११६
एकूण बरे झालेले  रुग्ण - ५६
उपचार घेत असलेले रुग्ण -५७
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - ३
  

From around the web