उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे दहा रुग्ण वाढले @ १०४
Jun 4, 2020, 21:19 IST
उस्मानाबाद जिल्ह्याची कोरोना मध्ये शंभरी पार !
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्याने कोरोना मध्ये शंभरी गाठली आहे, जिल्ह्यातील दहा जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या १०४ झाली आहे. पैकी ४६ बरे असून तीन जण मृत्यू पावले आहेत.
आज दिनांक 04/06/2020 रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 74अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले आहेत.
त्यापैकी दहा पॉझिटिव्ह,एक inconclusive व 63 निगेटिव्ह आले आहेत.
सात रुग्ण काकानगर, उस्मानाबाद येथील असून हे सर्व पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातीलआहेत.
दोन रुग्ण शिराढ़ोन ता.कळंब येथील आहेत व एक रुग्ण सोन्नेवाडी ता. भूम येथील असून दहा दिवसांपूर्वी घाटकोपर मुंबई येथून आलेली आहे.
उस्मानाबाद शहरात आज नवीन सात रुग्ण आढळून आल्याने शहरातील कोरोना रुग्णाची संख्या आता २३ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - 104
एकूण बरे झालेले रुग्ण - 46
उपचार घेत असलेले रुग्ण - 55
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3
उस्मानाबाद शहरात आज नवीन सात रुग्ण आढळून आल्याने शहरातील कोरोना रुग्णाची संख्या आता २३ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - 104
एकूण बरे झालेले रुग्ण - 46
उपचार घेत असलेले रुग्ण - 55
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील १६ , लोहारा ६ व परांडा या तालुक्यात ११ रुग्ण सापडले असून कळंब तालुक्यात २१ रुग्ण सापडले आहेत तर भूम तालुका ३, वाशी तालुका ४ व उस्मानाबाद ३९, तुळजापूर येथे ४ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर कोरोनाचे १ हजार ७८५ स्वॅब तपासणीसाठी घेतले असून त्यापैकी १ हजार ५६४ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.