उस्मानाबाद जिल्ह्यात तीन पॉजिटीव्ह @ १४२

 
उस्मानाबाद जिल्ह्यात तीन पॉजिटीव्ह @ १४२


उस्मानाबाद -  दोन दिवसाच्या गॅपनंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात नळदुर्ग ता. तुळजापूर  येथील एक आणि परंडा येथील दोन रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता १४२ झाली आहे. पैकी ९० बरे झाले आहेत.


उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ जणांचा स्वाब आज १२ जून रोजी लातूरला पाठवण्यात आला होता, पैकी  तीन पॉजिटीव्ह ,  3 incunclusive व  5 निगेटिव्ह रिपोर्ट  आले आहेत. पॉजिटीव्ह रुग्णापैकी एक रुग्ण  नळदुर्ग येथील असून पूर्वीच्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या  संपर्कातील आहे.  दुसरे दोन रुग्ण  हे पोलीस कॉलनी, परांडा येथील असून सोलापूर रिटर्न आहेत.जिल्हयात रुग्णाची संख्या अशी 

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण 142
एकूण बरे झालेले  रुग्ण -99
उपचार घेत असलेले रुग्ण -40
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3


तालुकानिहाय रुग्ण 

उस्मानाबाद - 59
कळंब- 36
उमरगा - 16
परंडा - 15
लोहारा -2
वाशी - 0
तुळजापूर -12
भूम -2
From around the web