कोरोनाचा कहर : 5 जुलै रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात बारा पॉजिटीव्ह

 
कोरोनाचा कहर : 5 जुलै रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात बारा पॉजिटीव्ह


उस्मानाबाद - जिल्ह्यातील शनिवारच्या पेंडिंग रिपोर्ट मधील बारा जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उमरगा तालुक्यातील आठ, उस्मानाबाद तालुक्यातील दोन, तुळजापूर आणि कळंब तालुक्यातील प्रत्येकी एक असा समावेश आहे.

 ४ जुलै रोजी  सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 157 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 पॉजिटीव्ह, 138 नेगेटिव्ह, व 17 पेंडिंग असा रिपोर्ट प्राप्त  झाला होता.१७ पेंडिंग मधील बारा पॉजिटीव्ह आले आहेत.

उमरगा तालुका 

उमरगा शहर - २ ( शेंडगे हॉस्पिटल १ )
नागराळ - ३
गुंजोटी - ३

उस्मानाबाद तालुका 

दोन रुग्ण उस्मानाबाद तालुक्यातील असून, एक झोरे गल्ली उस्मानाबाद येथील व दुसरा इर्ला ता. उस्मानाबाद येथील आहे.

कळंब तालुका 
उपळाई ( ता. कळंब ) - १
( सोलापूर येथे एडमिट )

तुळजापूर तालुका 
धोत्री - १ 

From around the web