उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण वाढले @ ७३
May 31, 2020, 19:53 IST
आणखी दहा अहवाल प्रलंबित , चिंता वाढली
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रविवारी दोन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता ७३ झाली आहे.
आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णात नळदुर्ग शहरातील एक ५० वर्षांचा एक पुरुष आणि सुंभा ता. उस्मानाबाद येथील ५३ वर्षांचा एक पुरुष आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील ९० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ७५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व तीन व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे. आणखी दहा अहवाल प्रलंबित असून, त्यांचे रिपोर्ट आज रात्री उशिरा किंवा उद्या येणार आहेत.