उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना पॉजिटीव्ह सात @ ७१
May 30, 2020, 21:50 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आता कोरोनाने हात- पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आज सात जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता ७१ झाली आहे.
आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णात कळंब शहरातील पाच ( मुंबई रिटर्न ), शिराढोण ( ता. कळंब ) येथील एक आणि बेडगा ( ता. उमरगा ) येथील एक असा समावेश आहे. शिराढोण आणि बेडगा रुग्ण अगोदरच्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
उस्मानाबाद जिल्हयातील 52 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 44 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 07 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे.
- उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - ७१
- एकूण बरे झालेले रुग्ण - १५
- उपचार घेत असलेले रुग्ण - ५४
- एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - २