धक्कादायक : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे ११ रुग्ण वाढले @ ८८
Jun 2, 2020, 20:27 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उस्मानाबाद शहरातील ८, कळंब शहरातील २ आणि कळंब तालुक्यातील शिरढोण येथील एक अश्या ११ जणांचा समावेश आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आता ८८ झाली आहे.
आज दि. २ जून रोजी 55 स्वाबचे रिपोर्ट प्राप्त झाले असून 11 रुग्णांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेले आहेत. 43 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. एक जणांचा रिपोर्ट inconclusive आला आहे.
पॉजिटीव्ह पेशंटची माहिती
8 रुग्ण उस्मानपुरा, उस्मानाबाद येथील असून ते नळदुर्ग येथील पूर्वी पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
2 रुग्ण कळंब येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत व एक रुग्ण शिराढोण येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे.
नळदुर्ग (ता.तुळजापूर) येथील पानटपरी चालकाच्या माध्यमातून उस्मानाबाद शहरातील उस्मानपुरा भागातील एकाच कुटुंबात तब्बल ८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, यामध्ये टपरीचालकाच्या आई, मुलगी, बहीण, जावयाचा समावेश आहे. प्रशासनाने संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन हा परिसर दुपारीच सील केला.
उस्मानाबाद शहरात १६ रुग्ण
उस्मानाबाद शहरात यापूर्वी ८ रुग्ण होते, त्यात आणखी आठ जणांची भर पडल्याने एकूण रुग्ण हे १६ झाले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी ७७ रुग्ण होते, त्यापैकी ३ मयत झाले असून, ३२ जण बरे झाले आहेत. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या आता ५३ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - 88
एकूण बरे झालेले रुग्ण - 32
उपचार घेत असलेले रुग्ण - 53
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - 88
एकूण बरे झालेले रुग्ण - 32
उपचार घेत असलेले रुग्ण - 53
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3