चिंताजनक : उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी तब्बल १०५ कोरोना पॉजिटीव्ह , चार जणांचा मृत्यू
Wed, 29 Jul 2020
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी १०५ कोरोना पॉजिटीव्ह रिपोर्ट आल्याने चिंता वाढली आहे. त्यात उमरगा तालुक्यात ४७ आणि उस्मानाबाद तालुक्यात ३८ रुग्ण पॉजिटीव्ह आले आहेत. त्याचबरोबर गेल्या २४ तासात चार जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपकेंद्र येथे काल ४८७ स्वाब पाठवण्यात आपले होते. त्यापैकी ३७० अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी १०५ पॉजिटीव्ह आणि २०४ निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत तर ११७ रिपोर्ट प्रलंबित आहेत.
सविस्तर बातमी वाचा
https://play.google.com/store/apps/details?id=osmanabad.live