भूम तालुक्यातील दोन रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह
Jun 26, 2020, 20:47 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे. दोन्ही रुग्ण नाळीवडगाव ता. भूम येथील असून, पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. तसेच अंबाजोगाई आणि सोलापूर येथे उपचार घेत असलेले दोन रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले आहेत.
उस्मानाबाद येथून आज दि. २६ जून रोजी 81 स्वाब तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून दोन पॉजिटीव्ह दोन inconclusive व 77 निगेटिव्ह असा रिपोर्ट आला आहे.
पॉजिटीव्ह दोन्ही रुग्ण नाळीवाडगाव ता. भूम येथील असून ते पूर्वीच्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत. तसेच आजच्या रिपोर्ट मध्ये बाहेरगावी असलेले दोन रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्याच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. गिरवली ता. भूम. चा रुग्ण अंबाजोगाई येथे आणि तुळजापूरचा एक रुग्ण सोलापूर येथे उपचार घेत होता. ते उस्मानाबाद जिल्ह्याच्या यादीमध्ये आले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात
कोरोना बाधित एकूण रुग्ण - १९८
बरे झालेले रुग्ण - १५२
मृत्यू पावलेले रुग्ण - ९
ऍक्टिव्ह रुग्ण - ३७
उस्मानाबाद जिल्ह्यात एक्टीव्ह असलेले 37 रुग्ण. उस्मानाबाद -4.. तुळजापूर -20.कळंब 8. सोलापूर - 3. निलंगा - 1.अंबाजोगाई 1.उपचार घेत आहेत.