उस्मानाबादच्या प्रयोगशाळेचे अहवाल येण्यास सुरुवात, २७ पैकी ६ कोरोना पॉजिटीव्ह

 
उस्मानाबादच्या प्रयोगशाळेचे अहवाल येण्यास सुरुवात, २७ पैकी ६ कोरोना पॉजिटीव्ह


उस्मानाबाद - उस्मानाबादेत दानशूर व्यक्तींच्या मदतीतून सव्वा कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे अहवाल येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी एकूण २८ स्वाब पाठवण्यात आले होते, त्यापैकी २७ स्वाबचे अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी सहा कोरोना पॉजिटीव्ह रिपोर्ट आले आहेत. तसेच सोलापूर येथे दोन रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शनिवारी आणखी आठ रुग्णाची भर पडली आहे. दिवसभरात १३ रुग्णाची भर पडली आहे तर एकाचा मृत्यू झालेला आहे.


दि. 24 जुलै  रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे उस्मानाबाद तालुक्यातील 28 स्वाब नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 27 रिपोर्ट्स आज दुपारी प्राप्त झाले असून त्याचा अहवाल पुढीलप्रमाणे ..

➤ पाठवलेले स्वाब नमुने - 28
➤ प्राप्त रिपोर्ट्स - 27
➤ पॉझिटिव्ह -6
➤ निगेटिव्ह - 21
➤ पेंडीग - 1


पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे.

उस्मानाबाद :- 8

1) 48 वर्षीय स्त्री, रा. मारवाड गल्ली, उस्मानाबाद

2) 50 वर्षीय पुरूष, रा. वडगाव सिद्धेश्वर ता. उस्मानाबाद

3) 33 वर्षीय पुरुष रा. सिद्धार्थ नगर,सांजा रोड उस्मानाबाद.

4) 50 वर्षीय पुरूष रा. टाकळी ढोकी ता. उस्मानाबाद

5) 25 वर्षीय स्त्री रा. कौडगाव बावी ता. उस्मानाबाद

6) 25 वर्षीय स्त्री रा. कौडगाव बावी ता. उस्मानाबाद

7) 50 वर्षीय पुरूष रा. घुगी ता. उस्मनाबाद (सोलापूर येथे उपचार घेत आहे)

8) 45 वर्षीय स्त्री रा. बार्शी नाका, यशवंत नगर उस्मानाबाद
(सोलापूर येथे उपचार घेत आहे) ➽जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 633

➽जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 414

➽जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 184

➽जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 35

*वरील माहिती. दि  25/07/2020 रोजी सायंकाळी 6:45 वाजेपर्यंत ची आहे.

उस्मानाबाद लाइव्ह वरील बातम्या जलदगतीने वाचण्यासाठी उस्मानाबाद लाइव्ह न्यू अँप डाऊनलोड करा.. त्यासाठी खालील लिंक वापरा ... 

https://play.google.com/store/apps/details?id=osmanabad.live

From around the web