उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह

 

उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह



उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच  जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे. पैकी तीन रुग्ण भूम तालुक्यातील , एक रुग्ण उस्मानाबाद तालुक्यातील तर एक रुग्ण उमरगा तालुक्यातील आहे.



आज २४  जून रोजी सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथून ४६ स्वाब  तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत, त्यापैकी पाच  पॉजिटीव्ह  व ३९  नेगेटिव्ह  रिपोर्ट आले आहेत.



पॉजिटीव्ह  तीन रुग्ण  भूम तालुक्यातील नाळी वडगाव एक , ईडा एक आणि भूम शहरातील लक्ष्मीनगर एक तसेच उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली एक आणि  औंढा ता. निलंगा, लातूर येथील असून तो उमरगा येथील खाजगी  रुग्णालयात उपचार घेत आहे.   सर्व रुग्ण पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.


उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 
कोरोना बाधित रुग्ण -१९१ 
बरे झालेले रुग्ण - १४० 
मृत्यू - ८
ऍक्टिव्ह रुग्ण - ४३




From around the web