उस्मानाबाद जिल्ह्यात तीन रुग्णाची भर @ १८६

 
नळदुर्ग मध्ये आणखी एका रुग्ण आढळला 

उस्मानाबाद जिल्ह्यात तीन रुग्णाची भर @ १८६

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. सर्व पॉजिटीव्ह रुग्ण तुळजापूर तालुक्यातील आहेत.


आज २३ जून रोजी सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथून 53 स्वाब  तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत, त्यापैकी तीन  पॉजिटीव्ह  व 50 नेगेटिव्ह आहेत.

पॉजिटीव्ह  दोन  रुग्ण  सलगरा (दि ) ता. तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या च्या संपर्कातील आहेत .  एक रुग्ण  नळदुर्ग ता. तुळजापूर येथील  असून पूर्वीच्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या  संपर्कातील आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 

कोरोना बाधित रुग्ण - १८६ 
बरे झालेले रुग्ण - १३६
मृत्यू - ८
ऍक्टिव्ह रुग्ण - ४२ 


ऍक्टिव्ह रुग्ण  उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर २३,कळंब  -९, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद -५ .लातूर -1 व सोलापूर -4. असे एकूण 42 रुग्ण उपचार घेत आहेत.


From around the web