कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी १२ रुग्ण वाढले
Jul 16, 2020, 19:31 IST
गुरुवारी दिवसभरात २१ रुग्णाची भर @ ४७०
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पाचशेच्या आसपास झाले आहेत. गुरुवारी सकाळी उस्मानाबाद शहरातील ९ रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह आले होते तर सायंकाळी आलेल्या रिपोर्टनुसार आणखी १२ रुग्ण पॉजिटव्ह आले आहेत. दिवसभरात २१ रुग्णाची भर पडली आहे तसेच आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद येथून दि. 15 जुलै रोजी. सा. रु. उस्मानाबाद येथून 164 स्वाब नमुने स्वा. रा. ती. ग्रा. शा. वै. महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले, असून त्याचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.
पाठवलेले स्वाब नमुने -164.
प्राप्त अहवाल -164.
पॉजिटीव्ह -12.
अनिर्णित -04.
निगेटिव्ह -148.
पॉजिटीव्ह रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
उस्मानाबाद तालुका - 6
➥ 30 वर्षीय पुरुष, रा. कारागृह उस्मानाबाद.
➥28 वर्षीय पुरुष, रा. कारागृह उस्मानाबाद.
➥08 वर्षीय मुलगा रा. रामनगर , उस्मानाबाद. (पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील ).
➥ 35 वर्षीय पुरुष , रा. कारागृह , उस्मानाबाद.
➥ 35 वर्षीय पुरुष. रा. काळा मारोती चौक, नाना डेअरी जवळ उस्मानाबाद. (पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील, शा. रु. उस्मानाबाद येथील कर्मचारी ).
➥ 23 वर्षीय पुरुष रा. मेंढा. ता. उस्मानाबाद.
भूम तालुका -1.
➥28 वर्षीय पुरुष रा. राळेसांगवी ता. भूम (सध्या सा. रुग्णालय उस्मानाबाद येथे उपचार घेत आहे )
उमरगा तालुका -3.
➥ 35 वर्षीय महिला. रा. आरोग्य नगर, उमरगा.
➥14 वर्षीय मुलगी. रा. आरोग्य नगर, उमरगा.
➥38 वर्षीय पुरुष. रा. तुरोरी, ता. उमरगा.
तुळजापूर तालुका - 2.
➧ 65 वर्षीय पुरुष. रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर.
➧26 वर्षीय पुरुष. रा. काटी. ता तुळजापूर.
त्यामुळे आज जिल्ह्यात एकूण 12 कोरोना बाधितांची भर पडली आहे.
➤आज 60 वर्षीय पुरुष. रा. बाऊची ता. परांडा, बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू
➤आज पर्यंत जिल्ह्यतील एकूण रुग्ण संख्या -470.
➤आज पर्यंत चे एकूण डिस्चार्ज -277.
➤आज पर्यंत चे एकूण मृत्यू- 21. -*
➤आज दि. 16/07/2020 रोजी उपचार घेत असलेले एकूण रुग्ण -172.
वरील माहिती दि. 16/07/2020, सायंकाळी 7 वाजेपर्यंतची आहे.