कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी १८५ पॉजिटीव्ह, तिघांचा मृत्यू
By AdminSat, 15 Aug 2020
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी ( १५ ऑगस्ट ) रोजी १८५ जण कोरोना पॉजिटीव्ह आले आहेत तर गेल्या २४ तासात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोना बाधित रुग्णाची संख्या ३४१४ गेली आहे तर १६५० बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच ९७ जणांचा आजपर्यंत बळी गेला आहे.