कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी तीन पॉजिटिव्ह @ १४७
Jun 14, 2020, 21:26 IST
उस्मानाबाद - सलग तिसऱ्या दिवशी उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात एक रुग्ण फनेपुर ( ता. लोहारा ), एक रुग्ण तामलवाडी ( ता. तुळजापूर ) आणि एक रुग्ण माळुंब्रा (ता. तुळजापूर )शहरातील आहे.
आज १४ जून रोजीसामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 74 स्वाब तपासणी साठी लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून तीन पॉजिटीव्ह आले आहेत व 71 रिपोर्ट्स नेगेटिव्ह आले आहेत.
एक रुग्ण फनेपुर ता. लोहारा येथील असून पुणे रिटर्न आहे. एक रुग्ण तामलवाडी ता. तुळजापूर येथील असून सोलापूर रिटर्न आहे. व एक रुग्ण माळुंब्रा (ता. तुळजापूर येथील असून ती मुंबई रिटर्न आहे.
आज एकूण नवीन तीन रुग्णांची भर पडली आहे.
कोरोना बाधित रुग्ण - १४७
बरे झालेले रुग्ण - ११५
मृत्यू पावलेले रुग्ण - ५
ऍक्टिव्ह रुग्ण - २७