दिलासाजनक बातमी : सलग दुसऱ्या दिवशी एकही कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण नाही !

 
दिलासाजनक बातमी : सलग दुसऱ्या दिवशी   एकही कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण नाही !


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळला नाही, त्यात १३८ पैकी ९० रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात समाधान व्यक्त केले जात आहे.

मंगळवारी एकूण १५ रुग्ण पॉजिटीव्ह आल्यानंतर खळबळ उडाली होती, मात्र काल बुधवार आणि आज गुरुवार रोजी एकही पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. आज एकूण ३१ जणांचे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पैकी २८ निगेटिव्ह, २  Inconclusive आणि एक Rejected  रिपोर्ट आलेला आहे.


जिल्हयात रुग्णाची संख्या अशी 

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण 138
एकूण बरे झालेले  रुग्ण -90
उपचार घेत असलेले रुग्ण -43
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3


तालुकानिहाय रुग्ण 

उस्मानाबाद - 58
कळंब- 36
उमरगा - 16
परंडा - 13
लोहारा -2
वाशी - 0
तुळजापूर -11
भूम -2

From around the web