गुड न्यूज ! उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त...

 

गुड न्यूज ! उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त...

उस्मानाबाद  - कोरोनाच्या संदर्भात उस्मानाबाद जिल्ह्यासाठी गुड न्यूज  आहे. जिल्ह्यातील तिन्ही कोरोना बाधित रुग्णांचा दुसरा रिपोर्टही  निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील  तिन्ही रुग्णांचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा एकदा  स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.  तोही  निगेटिव्ह आल्याने आता तिन्ही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले.

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यात उमरगा तालुक्यातील दोन आणि लोहारा तालुक्यातील एका  रुग्णाचा समावेश आहे. त्यांच्यावर उमरगा उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांचा  स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर पहिला रिपोर्ट आणि दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत  तीन कोरोना बाधित रुग्ण वाढल्याने  हा जिल्हा ऑरेंज झोन मध्ये आहे. विशेष म्हणजे या तिन्ही रुग्णांचा दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आज  २० एप्रिल पासून राज्य सरकारने  लॉकडाऊनच्या काही अटी शिथिल केल्या आहेत . उस्मानाबाद जिल्ह्यात काही अटी शिथिल करण्यात आल्याचे परिपत्रक निघाले आहे. 

इतर जिल्ह्यातील लोकांना उस्मानाबाद जिल्ह्यात येण्यास बंदी केल्यास आणि सोशल डिस्टन्सिंग पाळल्यास हा जिल्हा कायम कोरोना मुक्त होवू शकतो. लोकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये तसेच तोंडावर आणि नाकावर नेहमी मास्क आणि रुमाल बांधावा,  असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी केले आहे. 


उस्मानाबाद जिल्हयाने घेतला मोकळा श्वास... 
गेल्या 19 दिवसांत उस्मानाबाद जिल्ह्यात एकही रुग्णाची भर पडलेली नाही तर कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व 85 नागरिकांची कोरोना चाचणीसुद्धा निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांचा जीव अखेर भांड्यात पडला आहे. परंतु, खबरदारी म्हणून जिल्ह्यात लॉकडाउनचे पूर्ण पालन केले जात आहे.

उस्मानाबाद जिल्हा आजपर्यंत ऑरेंज झोन मध्ये होता, तो आता ग्रीन झोन मध्ये आला आहे. आता कायम ग्रीन झोन मध्ये राहण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. 


हे नक्की वाचा ... 

From around the web