उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयाचा एक कर्मचारी कोरोना बाधित

 
उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयाचा एक कर्मचारी कोरोना बाधित


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे.८ जुलै रोजीच्या पेंडिंग आठ रिपोर्ट मधील तीन पॉजिटीव्ह आले आहेत. त्यात एक जुना रुग्ण आणि दोन नवीन रुग्ण आहेत, गंभीर बाब म्हणजे उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक कर्मचारी पॉजिटीव्ह आल्याने कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. दि. ८ जुलै रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 157 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते,  त्यापैकी 20 पॉजिटीव्ह,  120 निगेटिव्ह,  एक रिजेक्टेड  व ८ अनिर्णित व 8 पेंडिंग असा रिपोर्ट प्राप्त झाले होते. पेंडिंग मधील आठ जणांचा रिपोर्ट गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झाला आहे तर ९ जुलै रोजीचे रिपोर्ट अद्याप आले नाहीत. 

आठ पेंडिंग मधील तीन पॉजिटीव्ह रिपोर्ट आले आहेत. त्यात एक उमरग्याचा एक जुना रुग्ण आहे. तसेच  दोन नव्या रुग्णामध्ये सावरगाव ता. तुळजापूर येथील एक रुग्ण आहे. दुसरा रुग्ण उस्मानाबाद शहरातील खाजानगर भागातील असून तो सामान्य रुग्णालयातील कर्मचारी आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचा  कर्मचारी पॉजिटीव्ह निघाल्यानंतर कर्मचाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.

 ➤ एकूण कोरोना बाधित रुग्ण - ३३३
➤ बरे झालेले रुग्ण - २१३
➤ मृत्यू - १४
➤ एक्टीव्ह रुग्ण - १०६ 

लॉकडाऊन : रविवार ऐवजी शनिवार ठरला आत्मघातकी निर्णय !

उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी रविवारी लॉकडाऊन केले जात होते. मात्र गेल्या आठवड्यापासून रविवारी ऐवजी   शनिवारी लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे या आठ्वडूयात जिल्ह्यात विशेषतः उस्मानाबाद शहरात मोठया प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. हा निर्णय आत्मघातकी असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. 

रविवारी लोक मोठ्या प्रमाणत बाजारात येऊन गर्दी केल्याने तसेच कोणतेही सामाजिक अंतर न  पाळल्याने कोरोना वाढत आहे. लोक कोरोना गंभीर घेत नसल्याने रुग्ण वाढत आहेत आणि त्याचा ताण आरोग्य आणि पोलीस यंत्रणेवर येत आहे. 

बँका आणि अन्य कार्यालयातील  गर्दी अंगलट 

महिन्याच्या  पहिल्या सोमवारी बँका तसेच अन्य कार्यालयात लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर न पाळणे, मास्क न घालणे आदीमुळे कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. 


From around the web