सिव्हिल हॉस्पिटल : कोरोना आयसोलेशन कक्षातील रुग्णाचा बाथरूममध्ये मृत्यू
May 28, 2020, 16:06 IST
मृत्यूचे कारण अस्पष्ट : कोरोना रिपोर्टकडे लक्ष
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेला एक संशयित रुग्ण उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आला होता. त्यास सतत खोकला येत असल्याचे समजते. गुरुवारी सकाळी हा रुग्ण बाथरूममध्ये गेला असता तो आतध्ये पडून मयत झाला. त्याने बाथरूमची कडी आतून लावली होती.
एक तास झाला तरी हा रुग्ण बाहेर आला नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडून त्यास आतमध्ये पहिले असता तो मयत झालेला होता. या घटनेमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात खळबळ उडाली आहे. त्याचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला हे अजून तरी स्पष्ट झालेले नाही. त्याचा स्वाब तपासणीसाठी लातूरला पाठवण्यात आलेला आहे. त्याचा रिपोर्ट काय येतो, याकडे लक्ष वेधले आहे.
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांच्याशी सायंकाळी संपर्क झाला असता, त्यांनी सांगितले की, उस्मानाबाद शहरातील विकासनगर मधील एका ३४ वर्षीय तरुणास श्वसनाचा त्रास होत होता म्हणून बुधवारी त्यास संशयित म्हणून या कोरोना वार्ड मध्ये ठेवण्यात आले होते. आज ( गुरुवारी ) सकाळी दहाच्या सुमारास तो शौचालयमध्ये गेला असता, बराच वेळ झाला तरी बाहेर आला नाही, त्याकरिता दरवाजा तोडून पहिले असता, तो मयत झालेला होता. त्याचा कोरोना रिपोर्ट अद्याप आलेला नाही.
धक्कादायक : कोरोना बाधित रुग्ण उस्मानाबाद शहरात फिरला
धक्कादायक : कोरोना बाधित रुग्ण उस्मानाबाद शहरात फिरला