उस्मानाबादेत ७९ हजार रुपयांचे बोगस सॅनिटायझर जप्त

 
उस्मानाबादेत ७९ हजार  रुपयांचे बोगस सॅनिटायझर  जप्त

उस्मानाबाद -  एकीकडे कोरोनामुळे उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यातील जनता भयभीत झाली असताना दलालांनी  या परिस्थितीचा गैरफायदा उठवण्यास सुरुवात केली आहे. शहरात ७९ हजार  रुपयांचे बोगस   हॅण्ड सॅनिटायझर जप्त करण्यात आले आहे.  अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद शहरात हॅण्ड सॅनिटायझरला बाजारात खूप मोठी मागणी आहे. यात भेसळ होण्याची शक्यता अगोदरपासूनच वर्तवली जात होती. पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारले होते.

 २० मार्च रोजी अन्न व औषध प्रशासनाने समता नगरमधील सिद्धांत मेडिकल मधील सॅनिटायझर तपासले  असता त्यात गडबड दिसून आली. या मेडिकलला पुरवठा बार्शी येथून होतो. मात्र खरेदी केलेल्या पावत्या आणि उपलब्ध असलेले सॅनिटायझरयात तफावत होती.१०० मिली. आणि २५० मिली चे हे वेगवेगळे दोन नमुने आहेत.दोन वेगवेगळ्या पॅकिंगच्या सॅनिटायझरचे नमुने मुंबई येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.जवळपास  ७९ हजार  रुपयांचे  भेसळ केलेले हॅण्ड सॅनिटायझर जप्त करण्यात आले आहे.


बोगस आणि खरं सॅनिटायझर कसं ओळखाल?



उस्मानाबादेत ७९ हजार  रुपयांचे बोगस सॅनिटायझर  जप्त
  • मुंबईत मेड इन वाकोला, मेड इन चारकोप असं बारीक टाइपमध्ये लिहिलेली सॅनिटायझर्स मिळत आहेत 
  • तेव्हा सॅनिटायझर खरेदी करताना प्रमाणित कंपनीचं नसेल तर विकणाऱ्या माणसावर विश्वास न ठेवता ते नीट तपासून पाहा
  • संस्कार आयुर्वेद हँड सॅनिटायझर अशा नावानेही बोगस सॅनिटायझर विकलं जात आहे ते कुठे बनवलं गेलं आहे हे तपासा.
  • संस्कार आयुर्वेद हँड सॅनिटायझर हेदेखील मेड इन वाकोला आहे. त्यामुळे ते खरेदी करुन हात स्वच्छ करत असाल तर सावधान !
  • वाकोल्यातल्या संस्कार आयुर्वेद या छोटेखानी कंपनीवर निकृष्ट दर्जाचं सॅनिटायझर बनवलं जात होतं. तिथे छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे.
  • मेड इन चायना याला टक्कर देणारे काही ब्रँड बाजारात आले आहेत तेव्हा त्यापासून सावधान
  • १०० ते १५० ML हँड सॅनिटायझर जास्त किंमतीला विकलं जातं आहे.१२ मार्चला एफडीएने धाड टाकून जवळपास १ लाख किंमतीचा कच्चा माल आणि इतर साधनं जप्त केली आहेत.

From around the web