भूमच्या पाच जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह

 

भूमच्या पाच जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह

उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. सर्वच्या सर्व रुग्ण लक्ष्मीनगर, भूम येथील असून, पूर्वीच्या रुग्णाच्या  संपर्कातील आहेत. दरम्यान, आतापर्यंत १५९ कोरोना रुग्ण सापडले असून, पैकी १२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाच जणांचा मृत्यू झाला असून, केवळ २९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 
उस्मानाबाद जिल्ह्यातील ४७ जणांचा स्वाब आज तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे पाठवण्यात आला होता, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून, पैकी पाच पॉजिटीव्ह तर ४२ निगेटिव्ह रिपोर्ट आहेत.; पाचही पॉजिटीव्ह रुग्ण  लक्ष्मीनगर, भूम येथील असून, पूर्वीच्या रुग्णा संपर्कातील आहेत.


उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना अपडेट 

एकूण बाधित रुग्ण  - १५९ 
बरे झालेले रुग्ण - १२५
मृत्यू पावलेले रुग्ण - ५
ऍक्टिव्ह रुग्ण - २९ 


From around the web